महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र लाडली बहना योजना 2024 लाँच करण्याची घोषणा केली. या योजनेद्वारे राज्यातील 21 वर्षे ते 60 वर्षे वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरणाद्वारे दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- वय प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- कौटुंबिक रेशन कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
लाभ काय मिळनार ?
- दर महीना १,५०० रुपए मिलनार
- दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
- अंमलबजावणी : जुलै 2024 पासून
कोण असणार पात्र?
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल