महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना ही मदत दिली जाईल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केलीए.